Sanstha Logo
श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा

मुख्यपृष्ठशाळा › महाराष्ट्र विद्यालय

🎓

महाराष्ट्र विद्यालय, बनसारोळा

Maharashtra Vidyalaya, Banasarola

बनेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा संचलित · ता. केज जि. बीड — आमची मूळ शाळा

📅 स्थापना 1958 📍 बनसारोळा, केज तालुका, बीड 🏠 वसतीगृह सुविधा 🌿 NCC · स्काउट गाईड 📚 ग्रंथालय व प्रयोगशाळा 🎯 17 मुख्याध्यापक (1957–आजपर्यंत)

"मानव वस्ती पूर्वीच बनेश्वराच्या वास्तव्याने पुनीत झालेली आणि मूळतः संस्कारीत असलेली या गावची माती आणि या मातीने संस्कारित केलेली इथली मती…"

22 मे 1958 रोजी ग्रामसभा बोलवण्यात आली व त्यामध्ये शिक्षण समिती स्थापन करण्यात आली. सर्व 18 पगड जातीतील मुले-मुली शिकल्या पाहिजेत असा विचार होता.

समितीची जबाबदारी स्वर्गीय काशिनाथराव गोरे, स्वर्गीय मदनराव काकडे, स्वर्गीय शंकरलाला तापडे, श्री नारायण गोरमाळी व दगडू पंत कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली. प्रत्येकाने 250 रुपये जमा करून दानशूर शेतकऱ्यांकडून देणग्या स्वीकारल्या.

स्वर्गीय तुकाराम पंत कुलकर्णी यांनी गट नंबर 97 मधील क्षेत्र 139 आर. जमीन शाळेला दान देऊन जागेचा प्रश्न मिटवला.

11 जून 1958 रोजी समितीची बैठक बोलवून "बनेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा ता. केज जि. बीड" असे नामकरण व "राखावी भवतांची अंतरे भाग्य येते तदनंतर" हे ब्रीदवाक्य ठरविण्यात आले. पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग घेऊन महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा या शाळेची सुरुवात झाली.

The Man Entrusted with the Mission

या ज्ञानयज्ञाच्या कार्यासाठी इस्थळ निवासी नारायण दादा काळदाते या वारकरी सांप्रदायाने संस्कारित असलेल्या व्यक्तीच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी ते कार्य पावित्र्याने चालवले, फुलवले आणि आपले आयुष्य समर्पित केले.

1958 मध्येच — म्हणजे शाळा सुरुवातीपासूनच — अनुसूचित जाती वसतीगृह व बनेश्वर वसतीगृहाची सुरुवात झाली. सुरुवातीची विद्यार्थी संख्या 600 इतकी होती.

भूक ही माणसाची प्राथमिक गरज आहे हे ओळखून, बहुजन गोरगरीब दलितांची मुले शाळेच्या वाटेला लागण्यासाठी जेवणाची व्यवस्था आधी केली. शाहू छत्रपतींच्या कोल्हापूर मॉडेलप्रमाणे वसतिगृहाची निर्मिती झाली.

सध्याच्या वसतीगृहातील सुविधा

🛏️ 13 पत्र्याच्या + 4 स्लॅबच्या रूम
🍳 स्वयंपाकघर व धान्यकोठार
🚿 9 बाथरूम / स्वच्छतागृहे
📖 वाचनालय (Reading Room)
💧 Water Filter (पिण्याचे पाणी)
🔥 अंघोळीसाठी गरम पाणी
🛏️ कॉट, गादी, पंखे
🥦 परसबागेतील भाजीपाला

Daily Routine — Hostel Students

5:00 AMव्यायाम 7:00 AMअभ्यास 8:30 AMसकाळचे जेवण 1:30 PMदुपारचा नाश्ता 7:00 PMसायंकाळचे जेवण 8–10 PMअभ्यासिका

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि मानसिक स्थिती यांकडे सारखेच लक्ष दिले जाते.

📊 मासिक चाचणी पद्धती

दर महिन्याला चाचणी — प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास बॅच दिले जातात. पुढील महिन्याच्या परीक्षेनंतर हस्तांतरण होते. निकोप स्पर्धा, विद्यार्थी व पालकांचा सत्कार प्रत्येक महिन्याला.

🔬 स्पर्धा परीक्षा तयारी

शासकीय व खाजगी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बसवणे, विशेष वर्ग घेणे. सहल, विविध ठिकाणच्या भेटी, संस्कृती कार्यक्रम.

🌿 सर्वांगीण दृष्टिकोन

पक्षी निरीक्षण, वस्तू बनवणे, शेती सहवास, पालक मेळावे, विविध मान्यवरांचे मेळावे. "आपली मुलं ही सुरक्षित ठेवण्यासाठी नाही तर ती चांगली माणसं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो."

उपलब्ध विभाग

🏋️ क्रीडा विभाग
📚 ग्रंथालय
🪖 NCC विभाग
⚜️ Scout & Guide
🎨 चित्रकला विभाग
🧪 प्रयोगशाळा
💻 संगणक कक्ष
🌱 परसबाग

शाळेत प्रवेश केल्यानंतर गेट रजिस्टर वर नोंद, वर्गात उपस्थिती आणि अभ्यास घेतला जातो. मुलांना संपूर्ण शाळेच्या वेळेत गेटच्या आत भरपूर जागा-मैदान उपलब्ध असल्यामुळे बाहेर जाण्याची गरज पडत नाही.

निसर्गरम्य वातावरणामध्ये सर्व विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आनंददायी पद्धतीने शिक्षण घेत आहेत.

या वसतीगृहात शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर आहेत — त्यांची यादी खूप लांब आहे, पण काही प्रमुख:

मधुकरराव गायकवाड
कुलगुरू (Vice Chancellor)
संभाजीराव शिंदे
सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राजस्थान उच्च न्यायालय
एस. के. जोगदंड
दलित चळवळीतील अग्रगण्य नेते
कॉम्रेड गंगा भीषण थावरे
समाजसेवी नेते
प्राध्यापक डॉ. बाबुराव सोमवंशी
Academic Professor
माजी कुलगुरू वाल्मीक सरवदे
Former Vice Chancellor

The school has been guided by 17 principals since its founding.

अ.क्र. मुख्याध्यापक कार्यकाळ
1श्री. त्र्यंबकराव कुलकर्णीजून १९५७ – मे १९६०
2श्री. दिवटे पी. जी.जून १९६० – नोव्हेंबर १९६०
3श्री. महाजन डी. व्ही.डिसेंबर १९६० – मे १९६१
4श्री. काकडे एम. व्ही.जून १९६१ – जून १९६२
5श्री. भिलेगावकरजुलै १९६२ – जून १९६३
6श्री. काकडे एम. व्ही.जुलै १९६३ – जून १९६४
7श्री. सारनीकरजुलै १९६४ – फेब्रुवारी १९७४
8श्री. काकडे एम. व्ही.मार्च १९७४ – ऑक्टोबर १९७७
9श्री. हारडे प्र. वि.नोव्हेंबर १९७७ – जून २००३
10श्री. तरकसे आर. बी.जून २००३ – मे २००८
11श्री. गरड एच. एल.जून २००८ – फेब्रुवारी २०१३
12श्री. पाटोळे डी. बी.मार्च २०१३ – जुलै २०१६
13श्री. हांडीबाग एच. आर.जुलै २०१६ – एप्रिल २०२३
14काकडे ए. के.मे २०२३ – जून २०२३
15काकडे आर. एम.जुलै २०२३ – जून २०२४
16शिंदे एम. पी.जुलै २०२४ – फेब्रुवारी २०२५
17काकडे आर. एम.मार्च २०२५ – Present

राखावी बहुतांची अंतरे
भाग्य येते तदनंतरे

संस्थेचे ब्रीदवाक्य

Enquire About Admission →
← View All Schools