श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा संचलित · ता. अंबाजोगाई जि. बीड
Run by Shree Baneshwar Shikshan Sanstha, Banasarola · Ambajogai Taluka, Beed District
"खऱ्या प्रेमाने, साध्या राहणीने, उच्च विचाराने — मुलांच्या हृदयात शिरता येते." — पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)
"With true love, simple living, and elevated thought — one can enter a child's heart." — Pandurang Sadashiv Sane (Sane Guruji)
श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळाचे संस्थापक कै. पू. नारायणराव रामराव काळदाते (दादा) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सन १९८३ मध्ये भावठाणा या छोट्याशा गावात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचा संकल्प करण्यात आला.
भावठाणा आणि परिसरातील खेडेगावातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या शहरांत जावे लागत असे. हे कष्टकरी व शेतमजूर कुटुंबांतील मुलांसाठी अशक्यप्राय होते. या वेदनेतूनच साने गुरुजी विद्यालय, भावठाणा या शाळेची निर्मिती झाली.
ज्यांचे संपूर्ण जीवन बालकांसाठी, समाजासाठी समर्पित होते, त्या थोर समाजसुधारक पांडुरंग सदाशिव साने — "साने गुरुजी" यांच्या नावाने शाळेला नाव देण्यात आले. हे नामकरण म्हणजे संस्थेच्या मूल्यांचेच प्रतिबिंब होते — माया, सेवा, शिक्षण.
साने गुरुजी विद्यालय भावठाणा हे अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम, डोंगरी, ग्रामीण भागात वसलेले एक महत्वपूर्ण शैक्षणिक केंद्र आहे. या विद्यालयाची स्थापना जून 1983 मध्ये झालेली असून अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य विद्यालय सातत्याने करत आहे. शाळेला शासनमान्यता प्राप्त असून मान्यता क्रमांक एस.एस. एन-1083/6797/एन/माशि-1 दिनांक 23/05/1983 आहे. विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे.
संस्थापकांचे योगदान व प्रेरणादायी कार्य:- साने गुरुजी विद्यालय, भावठाणा या विद्यालयाच्या स्थापनेत संस्थेचे संस्थापक सचिव "पूज्य नारायणदादा काळदाते" यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या उदात्त हेतूने त्यांनी शाळेच्या स्थापनेसह मागासवर्गीय वसतिगृह सुरू केले. मागासवर्गीय वसतिगृहाच्या सुरुवातीच्या काळात धान्य गावातून गोळा करून गावक-यांच्या सहकार्याने वसतिगृह चालत होते. वसतिगृहासाठी सरपण जळाऊ लाकूड गावातील शेतक-याकडून विना मूल्य वसतिगृहास आणून देत होते. वसतिगृहास समाज कल्याण विभागाची 36 मुलांची मान्यता आहे. त्या काळात ये - जा करण्यासाठी वाहनाची सोय नव्हती. सणाच्या दिवशी "दादा" मुलांना बनसारोळा येथून वसतिगृहाच्या मुलांना गोड खाऊ घेऊन चालत चालत येत असत विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना आधार व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
या विद्यालयाच्या स्थापनेच्या काळात "मानवलोक" या सेवाभावी संस्थेचे कार्यवाह मा. डॉ. द्वारकादासजी लोहीया (बाबुजी) यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सुरुवातीला शाळेला जागा नव्हती शाळा सुरू करण्यासाठी इमारत मानवलोक संस्था अंबाजोगाई यांचे कार्यवाह डॉ. लोहिया यांनी इमारतीचे मोलाचे कार्य केले. विद्यालयाच्या उभारणीसाठी व ग्रामिण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे विद्यालयाची पायाभरणी अधिक सक्षम झाली. आणि शाळेच्या प्रगतीस मोठी चालना मिळाली.
परिसरातील लोकांचे योगदान व विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी उपक्रम: - साने गुरुजी विद्यालयाच्या प्रगतीमध्ये भावठाणा व परिसरातील नागरिकांचेही महत्वपुर्ण योगदान लाभले आहे. शाळेच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी परीसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी सातत्याने सहकार्य करतात विशेषतः 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता स्पर्धा विशेष प्रगती आणि विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हजारो रूपयांची बक्षिसे 1986 पासून देण्यात येतात या बक्षिसाचे वितरण दरवर्षी स्वातंत्र्य दिना दिवशी केले जाते. पुढे काही वर्षांनी 1990-91 मध्ये नानाभाऊ सारसेकर यांची एक एकर जमीन शाळेस खरेदी करून दिली.
Under the visionary leadership of the founder of Shree Baneshwar Shikshan Sanstha, Banasarola, the late Narayanrao Ramrao Kaldate (Dada), a resolve was made in 1983 to light the flame of education in the small village of Bhavthana.
Students from Bhavthana and the surrounding villages had to travel to distant towns for secondary education — an impossibility for children of labouring and farm-worker families. It was out of this hardship that Sane Guruji Vidyalaya, Bhavthana came to be.
The school was named after the great social reformer Pandurang Sadashiv Sane — "Sane Guruji", whose entire life was devoted to children and society. This naming was itself a reflection of the Sanstha's own values: compassion, service, and education.
Sane Guruji Vidyalaya, Bhavthana, is an important centre of education in the remote,
hilly, rural part of Ambajogai taluka. Founded in June 1983, the school has consistently
provided quality education to students from rural areas for many years now. The school
holds government recognition, with approval number S.S.N-1083/6797/N/Mashi-1, dated
23/05/1983. The institution has built its own distinct identity in the field of
education.
Founder's Contribution and Inspiring Work: The founding secretary of
the Sanstha, "Pujya Narayandada Kaldate", made an invaluable contribution to the
founding of Sane Guruji Vidyalaya, Bhavthana. With the noble aim of giving rural,
backward-class students access to education, he started a hostel for backward-class
students alongside the school itself. In the hostel's early days, grain was collected
from the village and the hostel was run through the villagers' cooperation. Firewood
for the hostel was brought, free of cost, by farmers from the village. The hostel holds
Samaj Kalyan (Social Welfare) Department approval for 36 children. In those days there
was no transport available for travelling to and fro. On festival days, "Dada" himself
would walk all the way from Banasarola carrying sweets for the hostel children, taking
great pains to instil in students a love of learning and to give them support and
inspiration.
At the time this school was founded, the invaluable cooperation of Dr. Dwarkadasji
Lohiya (Babuji), secretary of the charitable organisation "Manavlok", was also
received. Initially the school had no premises of its own; Dr. Lohiya, secretary of
Manavlok Sanstha, Ambajogai, did invaluable work providing a building to get the school
started. He gave valuable support toward building the institution and spreading
education in the rural area. His contribution strengthened the school's foundation and
gave a major push to its progress.
Contribution of Local People and Initiatives that Inspire Students:
The citizens of Bhavthana and the surrounding area have also made an important
contribution to the progress of Sane Guruji Vidyalaya. Many generous individuals from
the area consistently support the school's development and students' academic
progress — in particular, thousands of rupees in prizes have been awarded since 1986 to
students from 5th to 10th grade for notable achievement in academic quality,
competitions, and various activities, with these prizes distributed every year on
Independence Day. A few years later, in 1990-91, Nanabhau Sarsekar purchased one acre
of land for the school.
आमची शाळा दुर्गम डोंगरी भागात स्थित असल्यामुळे अनेक गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मुख्य केंद्र ठरली आहे. भावठाणा, सोनवळा, धावडी, राजेवाडी, विविध तांड्यावरील व परिसरातील विद्यार्थी येथे 'शिक्षणासाठी' येतात विद्यार्थ्यांचे पालक बहुतेक मजुर शेतकरी किंवा शेतीशी संबंधित काम करणारे असल्यामुळे शाळा विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
विद्यालयाची इमारत प्रशस्त असून शाळेकडे सुमारे एकूण 43560 चौरस फुट जागा आहे. यामध्ये सुमारे 14582 चौरस फुट बांधकाम क्षेत्र असून विद्यार्थ्यांच्या खेळासाठी सुमारे 18050 चौरस फुट खेळाचे मैदान आहे. शाळेच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, शांत व निसर्गरम्य वातावरण उपलब्ध आहे. डोंगरी भागात असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणपूरक वातावरण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. वर्ग खोल्या प्रशस्त व सुसज्ज आहेत तसेच पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम आहे मुलींसाठी मुतारी व प्रसाधनगृह स्वतंत्र आहेत भरपूर पाण्याची सोय आहे. वसतीगृहासाठी अभ्यासाची व जेवणाची उत्तम सोय आहे. परिसरात व वर्गखोल्यामध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत सर्व शिक्षकवृंद अनुभवी व मेहनती आहेत.
Because our school is located in a remote, hilly area, it has become the main centre of education for students from many villages. Students come here for their education from Bhavthana, Sonawala, Dhavadi, Rajewadi, various tandas (hamlets), and the surrounding area. Since most students' parents are labourers, farmers, or otherwise engaged in agriculture-related work, the school plays a vital role in these students' lives.
The school building is spacious, with the school holding roughly 43,560 square feet of land in total. Of this, approximately 14,582 square feet is built-up area, and around 18,050 square feet is a playground for students. Trees have been planted around the school grounds, giving students a clean, peaceful, and scenic environment. Being in a hilly area, the natural beauty and eco-friendly surroundings prove beneficial for students' development. The classrooms are spacious and well-equipped, and drinking water facilities are excellent; girls have separate toilets and restrooms, with an ample water supply. The hostel has good arrangements for both study and meals. CCTV cameras have been installed around the campus and in classrooms, and the entire teaching staff is experienced and hardworking.
परिसर वैशिष्ट्ये
Campus Highlights
दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी शाळेत विविध सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी कथा-कादंबरी, चरित्रे, विज्ञान, कृषी व स्पर्धा परीक्षांशी संबंधित पुस्तकांनी सुसज्ज असे ग्रंथालय आहे, जे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करते. 'बुक बँक' योजनाही उपलब्ध आहे. शाळेत विज्ञान व गणितासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. स्वतंत्र स्टाफ रूम, प्रशासकीय कार्यालय, तसेच डिजिटल शिक्षणासाठी स्मार्ट क्लासरूम अथवा प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगणक शिक्षण व ई-लर्निंगसारख्या आधुनिक साधनांचा वापर करण्याचे प्रयत्न केले जातात.
The school offers various facilities to ensure quality education. To enhance students' knowledge, there is a well-equipped library featuring books on diverse subjects, including fiction, biographies, science, agriculture, and competitive examinations; this fosters a love for reading among students. A "Book Bank" scheme is also available. The school has separate laboratories for science and mathematics. Facilities such as a dedicated staff room, administrative offices, and smart classrooms or projectors for digital learning are provided. Efforts are made to utilise modern tools like computer education and e-learning.
शाळेत विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच मुलींसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छ परिसर याची व्यवस्था असून, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ग्रामीण व डोंगराळ भागाच्या गरजा लक्षात घेऊन शाळेत सौर ऊर्जा सुविधा, सुरक्षित संरक्षक कुंपण व आपत्कालीन सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
The school provides separate restrooms for students and teachers, as well as dedicated facilities for girls. Amenities include a supply of clean drinking water and a clean campus environment, with CCTV cameras installed to ensure safety. Considering the needs of the rural and hilly location, the school is equipped with solar energy facilities, secure compound fencing, and emergency safety measures.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात — प्रशस्त क्रीडांगण, क्रीडा साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम, योग व शारीरिक व्यायाम सत्रे, पर्यावरण जागृती मोहिमा, वृक्षारोपण मोहिमा व विविध स्पर्धांचे आयोजन. यासोबतच व्यक्तिमत्व विकास, करिअर मार्गदर्शन, इंग्रजी संभाषण कौशल्य, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यावरही भर दिला जातो.
शाळेच्या परिसरात कृषी शिक्षणासाठी छोटा प्रात्यक्षिक बगीचा, औषधी वनस्पती उद्यान पावसाचे पाणि साठवण प्रकल्प, पोषण बाग, स्थानिक कला व लोकपरंपरेशी संबंधीत उपक्रम राबविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक जीवनाशी निगडीत शिक्षण मिळण्यास मदत होते.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी व यश :- विद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत. काही विद्यार्थी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक
Various activities are implemented at the school to foster the physical, mental, and intellectual growth of students. Facilities and initiatives include a spacious playground, sports equipment, cultural programmes, yoga and physical exercise sessions, environmental awareness campaigns, tree plantation drives, and the organisation of various competitions. Additionally, emphasis is placed on personality development, career guidance, English conversational skills, scholarship preparation, and guidance for competitive examinations.
The school grounds host a small demonstration garden for agricultural education, a medicinal plant garden, a rainwater harvesting project, a nutrition garden, and activities connected to local arts and folk traditions. These help students receive an education rooted in local life.
Alumni and Achievements: Many students who studied at this school are successful today across various fields. Some students have gone on to become District Collectors, Tehsildars, police officers, teachers, professors
📖 वाचन संस्कृती
दर आठवड्याला "वाचन तास" असतो. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण वर्गात सादर केले जाते. साने गुरुजींच्या साहित्यावर विशेष चर्चासत्र दर वर्षी घेतले जाते.
🌿 पर्यावरण शिक्षण
वृक्षारोपण, पक्षी निरीक्षण, शेती भेट, जलसंधारण जनजागृती — विद्यार्थी निसर्गाशी जोडलेले राहावेत यासाठी शाळेने स्वतंत्र "हरित विभाग" स्थापन केला आहे.
📖 Reading Culture
There is a "reading hour" every week. Students present reviews of books they've read in class. A special discussion session on Sane Guruji's writings is held every year.
🌿 Eco Education
Tree planting, bird watching, farm visits, water conservation awareness — the school has established a dedicated "Green Department" to keep students connected with nature.
साने गुरुजी विद्यालय, भावठाणा हे दुर्गम, डोंगरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ज्ञान आणि व्यक्तीमत्व विकासाची संधी उपलब्ध करून देत आहे. आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण, सुसज्ज ग्रंथालय, खेळ, डिजिटल शिक्षण व भविष्यातील सुधारणा यांच्या माध्यमातून विद्यालय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
Sane Guruji Vidyalaya, Bhavthana, gives students from remote, hilly, and rural areas the opportunity for good values, discipline, knowledge, and personal development, alongside their education. Through modern facilities, a safe environment, a well-equipped library, sports, digital learning, and ongoing improvements, the school continues to work steadily toward a bright future for its students.
Principal
श्री. पालकर एस. डी.
Shri Palkar S. D.
M.A., B.Ed.
विद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत. काही विद्यार्थी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, सैनिक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, बँक अधिकारी, व इतर शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत. हे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतिक आहे.
Many students who studied at this school are successful today across a wide range of fields. Some alumni serve as District Collectors, Tehsildars, police officers, teachers, professors, doctors, engineers, soldiers, Gram Sevaks, Talathis, agricultural assistants, bank officers, and in other government services. This stands as a testament to the school's quality education.
"खऱ्या प्रेमाने शिकवणे हेच खरे शिक्षण"
"To teach with true love is the truest form of education."
— साने गुरुजी
— Sane Guruji